लहान मुलांसमोर आई-वडिलांनी कधीच 'या' 3 चुका करु नये, मुलांचे भविष्य अंधारात जाईल

Mansi kshirsagar
Sep 17,2024


लहान मुलांचे संगोपन करताना पालकही काही चुका करतात. पण या चुका टाळल्या पाहिजेत


आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जर आई-वडिल सातत्याने या चुका करत असतील तर मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो


आई-वडिलांनी कधीच मुलांसमोर अभद्र भाषा व चुकीचे शब्द बोलू नये


आई-वडील मुलांसमोर कठोर भाषा बोलत असेल तर मुलंदेखील तेच शिकतात आणि मग मुलांना समजावणे कठिण होऊन जाते


मुलांची भाषा बदलली तर त्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या भविष्यावर होऊ शकतो


आई-वडिलांनी कधीच मुलांसमोर खोटं बोलू नये. मुलांनादेखील हिच सवय लागते आणि भविष्यात त्यांचे गंभीर परिणाम होऊ शकतात


मुलांसमोर आई-वडिलांनी दुसऱ्यांना मान-सन्मान द्यायला हवा. हे पाहून मुलंदेखील हेच शिकतात.


भविष्यात मुलं पालकांसोबत व इतरांशी मान-सन्मान देऊन वागतात व बोलतात


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story