आचार्य चाणक्य हे आजच्या मॅनेजमेंटच्या जगात सर्वात महान विचारवंतांपैकी एक म्हणून ओळखले जातात.
चाणक्य नीतीमुळे जगभरात प्रसिद्ध असलेल्या चाणक्य त्यांच्याकडे आजही एक आदर्श मार्गदर्शक म्हणूनही पाहिलं जातं.
चाणक्य यांनी आपले विचार मांडताना, महिलांच्या अशा काही सवयींबद्दलही सांगितलं आहे की ज्यामुळे पतीची प्रगती होत नाही. या सवयी कोणत्या ते पाहूयात...
अनेकदा महिला काहीही कारण नसताना पतीवर शंका घेऊ लागतात. त्यामुळे घरचा करता पुरुष संतापतो, असं चाणक्य सांगतात.
सकाळी उशीरापर्यंत झोपण्याची महिलांची सवय आणि सायंकाळीही दिवे लागणीच्या वेळेस पहुडण्याच्या सवयीमुळे घरात दारिद्र येते, असं चाणक्य नीती सांगते. अशा घराची कधीच प्रगती होत नाही.
अनेक महिला सांयकाळी पुन्हा पीठ मळायला नको म्हणून अतिरिक्त पीठ एकाच वेळी मळून ठेवतात. मात्र हे असं करणं शास्त्रानुसार चुकीचं असल्याचं चाणक्य सांगतात. यामुळे घरातील सुख-समृद्धीचा नाश होतो असं म्हणतात.
अनेकदा महिला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल त्यांच्या मनानुसार विचार करुन मोकळ्या होतात. त्यामुळे घरात गैरसमज निर्माण होऊन वाद होतात, असं चाणक्य म्हणतात.
महिला स्वत: विचार करुन काही गोष्टींबद्दल आपलं मत बनवतात त्यामुळे होणाऱ्या वादांमुळे नवऱ्याचा चिडचिडेपणा वाढतो आणि त्याला कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही, असं चाणक्य नीती सांगते.
पतीच्या छोट्या छोट्या चुकांवरुनही पत्नी टोमणे मारते. ही गोष्ट पतीला अजिबात आवडत नाही आणि त्यावरुन वाद होतात.
सतत टोमणे मारल्याने पत्नी आपल्याला समजूनच घेत नाही अशी भावना पतीच्या मनात तयार होऊन, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला दोषी ठरवलं जात असल्याचं त्याला वाटतं.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारचा दावा केला गेलेला नाही.)