आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये मानवी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
चाणक्यांनी सांगितले की कोणत्या मित्रांवर विश्वास ठेवू नये आणि कोणते मित्र विश्वासघात करतात.
जे लोक तोंडावर गोड आणि पाठीमागे तुमच्यावर टीका करतात हे लोक विषासारखे असतात.
त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणे कधीही चांगले. या लोकांना आयुष्यातून काढून टाकले पाहिजे.
अशा लोकांना मित्र म्हणणे योग्य ठरणार नाही. हे लोक तुमच्यासाठी शत्रू आहेत.
अशा मित्रांवर विश्वास ठेवू नये कारण वाईट सवयींमुळे खरा मित्रही तुमचा विश्वासघात करू शकतो.
चाणक्यांच्या मते, कितीही जवळचा मित्र असला तरी त्याच्यासोबत तुमच्या आयुष्यातील गुपित शेअर करू नका.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)