सतत चुका दाखवल्याने मुलांचा आत्मविश्वास कमी होते आणि ते तुमच्यापासून दूर जातात.
ते बोलत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा बोलणे तोडणे यामुळे त्यांच्या भावना दुखावतात.
मुलांची भाऊ, बहिण किंवा इतर मुलांशी कधी तुलना करू नका. असे केल्याने त्यांच्या भावना दुखवल्या जावू शकतात.
त्यासोबत लहान-मोठ्या गोष्टींवर नियम लावू नका. यामुळे त्यांना मोकळेपणाने जगता येत नाही.
तसेच एका मुलाला जास्त आणि दुसऱ्या मुलाला कमी प्रेम किंवा लक्ष दिल्याने त्यांच्यामध्ये कटुता निर्माण होऊ शकते.
मुलांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून तुमचे निर्णय त्यांच्यावर लादू नका.
लहान-लहान गोष्टींवरून मुलांवर रागवू नका. त्यासोबत त्यांना शिक्षा देऊ नका.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)