यज्ञात आहुति देताना 'स्वाहा' का म्हणतात? यामागील कारण फारच रंजक; कारण जाणून व्हाल थक्क

Swapnil Ghangale
Jul 23,2025

शुभ कार्याच्या सुरुवातीला आणि शेवटी यज्ञ

हिंदू धर्मातील मान्यतेप्रमाणे कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला आणि शेवटी यज्ञ केलं जातं.

'स्वाहा' आवर्जून म्हटलं जातं

हवनादरम्यान यज्ञात आहुती देताना 'स्वाहा' असं आवर्जून म्हटलं जातं.

'स्वाहा' बोलण्यामागे एक खास कारण

यज्ञामध्ये आहुती देताना 'स्वाहा' बोलण्यामागे एक खास कारण आहे. अनेकांना हे कारणं ठाऊक नसतं.

'स्वाहा' कोण आहे?

यज्ञामध्ये आहुती देताना 'स्वाहा' यासाठी बोललं जातं कारण 'स्वाहा' हे अग्नी देवतेच्या पत्नीचं नाव आहे.

'स्वाहा' च्या माध्यमातूनच पोहोचते

आहुती देवापर्यंत 'स्वाहा' च्या माध्यमातूनच पोहचते, अशी मान्यता आहे.

'स्वाहा' काय करते?

हवनादरम्यान अग्नि देवता आहुती ग्रहण करतो. त्यानंतर 'स्वाहा' ही आहुती इतर देवतांपर्यंत पोहोचवते अशी मान्यता आहे.

'स्वाहा' कोण होती?

मान्यतेनुसार 'स्वाहा' प्रजापती दक्षची कन्या होती.

...तोपर्यंत यज्ञ यशस्वी होत नाही

जोपर्यंत देव आहुती स्वीकारत नाही तोपर्यंत यज्ञ यशस्वी होत नाही, असं मानलं जातं.

धार्मिक मान्यतांवर आधारित

(Disclaimer - येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)

VIEW ALL

Read Next Story