हिंदू शास्त्रात वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. मराठी महिन्यातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या वटपौर्णिमेला ज्येष्ठा पौर्णिमा असंही म्हणतात.
पितृदोष दूर करण्याठी देखील ज्योतिष शास्त्रात ज्येष्ठा पौर्णिमेला फार महत्त्व दिलं जातं.
ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला पितृदोषाची समस्या असल्यास अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.
नोकरीमधील अडचणी तसेच कौटुंबिक क्लेष या समस्यांमुळे अनेकजण नैराश्यात जातात.
असं म्हणतात की, सुख, शांती आणि निरोगी आरोग्यासाठी पितरांची शांती करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे.
असं म्हटलं जातं की, कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी ज्येष्ठा महिन्यातील पौर्णिमेला, नदीमध्ये दूध अर्पण केल्याने पितृदोष दूर होतात.
ज्येष्ठातील पौर्णिमेला, नदीमध्ये काळे तीळ, दूध आणि फुलं अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.
वटपौर्णिमेला नदीमध्ये दूध अर्पण करताना आपल्या तीन पिढ्यांचं स्मरण करावं .
असं केल्याने पित्रांना मुक्ती मिळते आणि कुंडलीती पितृदोष दूर होण्यास मदत होते. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )