हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अतिशय महत्त्व आहे. तुळशीला लक्ष्मीचं रुप मानलं गेलं आहे.
पण तुम्हाला तुळशीच्या मंजिरीचं काय करायच माहिती आहे का?
द्वादशीच्या दिवशी तुळशीच्या मंजिरी काढून टाकावी. असं म्हणतात हे केल्यामुळे लक्ष्मी मातेवरील ओझे कमी होते.
घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून तुळशीच्या मंजिरी शाळीग्राम देवाला अर्पण करा.
आर्थिक प्रगतीसाठी लाल कपड्यामध्ये तुळशीच्या मंजुळा बांधून तिजोरीत ठेवा.
आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी पर्समध्ये तुळशीच्या मंजुळा ठेवणे फायदेशीर मानले जाते.
अमाप संपत्ती मिळवण्यासाठी दररोज तुळशी चालीसा पाठ करा आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)