शनि अमावस्येच्या रात्री चुकूनही करु नका 'या' चुका

शनिदेवाला न्यायदाता म्हणून ओळखलं जातं. शनिदेव प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार त्याचं फळ देतात.

Shivraj Yadav
Jun 17,2023

शनिचा गोचर एका राशीत अडीच वर्षांपर्यंत

हिंदू ज्योतिषात शनी ग्रहाला दु;ख, रोग आणि वेदना यांचं कारण मानलं जातं. शनिचा गोचर एका राशीत अडीच वर्षांपर्यंत असतो.

कर्मांचंही मोठं योगदान

शनि कोणत्याही व्यक्तीला राजा किंवा रंक बनवू शकतो. यामध्ये कर्मांचंही मोठं योगदान असतं.

कोणत्या चुका टाळाव्यात?

त्यामुळे शनि अमावस्येच्या रात्री चुका करणं टाळा. या चुका कोणत्या ते समजून घ्या...

मांस आणि मद्य टाळा

शनि अमावस्येच्या रात्री मांस आणि मद्याचं सेवन करु नका. यांचं सेवन करणं फार अशुभ मानलं जातं.

जुगार खेळू नका

या दिवशी जुगार आणि सट्टा खेळू नका. यामुळे शनिदेव नाराज होतात.

पैशांची देवाण-घेवाण

शनि अमावस्येच्या रात्री उधारीसाठी देणं-घेणं टाळा. या दिवशी कोणाला उधार देऊ नका आणि घेऊही नका.

मोठ्यांचा आदर करा

शनि अमावस्येच्या रात्री वडिलधाऱ्यांचा आदर करा. कोणाचाही अपमान करु नका

लोखंड आणि तिळाचं दान

शनि अमावस्येला लोखंड, तेल, काळे कपडे आणि तिळाचं दान करणं शुभ मानलं जातं. यांची खऱेदी करणंही शुभ मानलं जातं.

VIEW ALL

Read Next Story