आषाढी एकादशीला चुकूनही करु नका 'या' 6 चुका! अन्यथा, विठ्ठुराया...
देवशयनी किंवा आषाढी एकादशी 6 जुलै रविवारी साजरी करण्यात येणार आहे.
आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी एकादशीचं व्रत केलं जातं.
आषाढी एकादशीला शुद्ध आणि सात्विक आहार घ्या. यादिवशी मांसाहारी पदार्थ, लसूण, कांदा आणि इतर तामसिक पदार्थ खाऊ नका.
आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची पानंही तोडू नयेत. असं केल्याने विष्णू भगवान नाराज होतील अशी मान्यता आहे.
एकादशीच्या दिवशी कोणत्याही मोठ्या किंवा वृद्ध व्यक्तीचा अपमान करणेदेखील टाळावे.
एकादशीच्या दिवशी काळे कपडे घालू नयेत. त्याऐवजी लाल आणि पिवळे कपडे घालणे शुभ मानले जाते.
या दिवशी गरजूंना मदत करावी आणि दानधर्म सारखे शुभ कार्य करावे.
देवशयनी एकादशीच्या दिवशी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. पूजाघर स्वच्छ करा आणि निर्जंतुक करा.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)