चंद्रग्रहणामुळे होळीचे रंग ‘या’ लोकांसाठी ठरणार खराब; पुढील 15 दिवस असणार कठीण
यावेळी होलिका दहन म्हणजे होळीचा सण 13 मार्च गुरुवारी असणार आहे. तर 14 मार्चला रंगांचा सण धुळवड असणार आहे.
यावर्षी रंगाच्या सणाच्या दिवशी पहिलं चंद्रग्रहण सण असणार आहे.
भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण 14 मार्च सकाळी 9.27 वाजेपासून दुपारी 3.30 वाजेपर्यंत असणार आहे. होळीचा रंग साजरा करताना चंद्रग्रहणाची सावली असणार आहे.
या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे सिंह आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात होणार आहे. त्यामुळे चंद्रग्रहण हे सूर्य राशीच्या लोकांसाठी खूप घातक ठरणार आहे. चंद्रग्रहणाचा प्रभाव 15 दिवसांपर्यंत असणार आहे.
सिंह राशीशिवाय कर्क आणि कन्या राशीच्या लोकांना सर्वात जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. कोणतेही नवीन काम सुरू करु नका.
कर्क राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. तुमच्या बोलण्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कोणाशीही भांडू नका.
कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी कोणतेही मोठं निर्णय घेऊ नयेत. घाईघाईत कोणतेही काम करू नका.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)