भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून गणेशोत्सव साजरा केला जातो.
यंदा 7 सप्टेंबरपासून गणेश चतुर्थीला सुरूवात होणार आहे.
बाप्पाच्या आगमनासाठी घरातील सारेच उत्सुक असतात. बाप्पाची मनोभावे पूजा करून अनंत चतुर्दशीला बाप्पाच विसर्जन केलं जातं.
बाप्पाच्या आगमनाने घरातील दुखः दूर होतात आणि घरात सुखसमृद्धी नांदते.
आपल्या लाडक्या गणरायची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी कुठले पूजेचे साहित्य गरजेचे आहे, ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गणपती मूर्ती, हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, अष्टगंध
10 सुपार्या, 5-5 खारीक, बदाम, हळकुंड, अक्रोड, 2 नारळ, 5 फळे, 25 विड्याची पाने
तुळस, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार, आंब्याच्या डहाळे
कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, सुटे पैसे, चौरंग, आसन, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)