प्रत्येक नात्यात वाद होत असतात. जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत असणे आवश्यक नाही.
त्यामुळे अनेकदा भांडण होते आणि जोडीदार तुमच्यावर रागवतो. अशा परिस्थितीत त्याला कसं मनवावं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सर्वात प्रथम कोणताही वाद मिटवण्यासाठी जोडीदाराची मनापासून माफी मागा. तुम्ही चूक केली असेल तर ती स्वीकारा.
जर एखादा व्यक्ती रागावला असेल तर त्याच्या भावना समजून घ्या. त्याच्या भावनांचा आदर करा.
त्याच्याशी चांगलं वागा. जसे की त्याच्या आवडीचे जेवण बनवा. तसेच त्याला प्रेमाचे संदेश पाठवा.
मात्र, जर तुमचा जोडीदार खूपच रागवला असेल तर त्याच्यासमोर काहीही करू नका. शांत रहा आणि त्याला थोडा वेळ द्या.
त्याचबरोबर फक्त माफी मागू नका. यापुढे भविष्यात अशी चूक होणार नाही हे त्याला पटवून द्या.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)