सुखी वैवाहिक जीवन आणि पैशासाठी, पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपावे?

नेहा चौधरी
Oct 20,2024


झोपेच्या दिशेचा आर्थिक स्थिती, करिअर, आरोग्य आणि वैवाहिक जीवनावर मोठा प्रभाव पडतो, असं वास्तूशास्त्रात सांगितलंय.


त्यामुळे वास्तुशास्त्रात पती-पत्नीच्या झोपण्याच्या दिशेसोबतच पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपावे हेही सांगितलंय.


पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शिवने अर्धनारेश्वराचे रूप धारण केलं तेव्हा त्यांच्या डाव्या शरीरातून स्त्री तत्व म्हणजेच माता पार्वती प्रकट झाली.


त्यामुळे हिंदू धर्मात पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला स्थान दिलंय. लग्न झाल्यानंतर पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला बसवलं जातं.


प्रत्येक धार्मिक आणि शुभ कार्यात पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला बसावे.


वास्तुशास्त्रानुसार पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे. यामुळे त्यांचं वैवाहिक जीवन आनंदी राहतं. तसंच घरात सुख-समृद्धी नांदते


झोपण्याच्या योग्य दिशा आणि नियमांचे पालन केल्यास नशीब पती-पत्नीला अनुकूल ठरतं. त्यांना कामात प्रमोशन मिळते आणि घरात संपत्ती वाढते, शिवाय नात्यात प्रेम अबाधित राहतं.


वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीची बेडरूम दक्षिण दिशेला असावी. तसंच झोपताना डोके देखील दक्षिण दिशेला असावे. यामुळे त्यांचं आरोग्यही चांगल राहण्यास मदत मिळते.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story