Ganesh Chaturthi 2023

तुमच्या राशीनुसार बाप्पाची अशी करा पूजा

मेष (Aries Zodiac)

या राशीच्या लोकांनी बाप्पाचरणी बेसन किंवा मोतीचूर लाडू अर्पण करावेत.

वृषभ (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांनी गणपतीला मोदक अर्पण केल्यामुळे आयुष्यातील सर्व त्रास आणि चिंता दूर होण्यास मदत होईल.

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांनी आपलं भाग्य जागृत करण्यासाठी गणपतीला हिरवे कपडे परिधान करावेत.

कर्क (Cancer Zodiac)

या राशीच्या लोकांनी बाप्पाला पांढऱ्या चंदनाचं टिळक लावा.

सिंह (Leo Zodiac)

गणपती बाप्पाला लाल फुलं अर्पण करणे या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरतं.

कन्या (Virgo Zodiac)

या राशीच्या लोकांनी बाप्पा चरणी सुपारी अर्पण करा.

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांनी गणरायाला पांढर फुलं अर्पण करावं.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीच्या लोकांनी बाप्पाला दुर्वाची माळा अर्पण करावी.

धनु (Sagittarius Zodiac)

या राशीच्या लोकांनी पिवळी फुलं, पिवळे कपडे आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावीत.

मकर (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांनी गणरायाला निळी फुलं अर्पण करावीत.

कुंभ (Aquarius Zodiac)

या राशीच्या लोकांनी बाप्पाला सुकामेवा अर्पण करावा.

मीन (Pisces Zodiac)

गणरायाला तुम्ही पिवळे कपडे आणि पिवळी फुलं अर्पण करा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story