मोदक बाप्पाला अतिशय प्रिय आहेत. गणेशचतुर्थीला बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. पण नेहमी नेहमी त्याच प्रकारचे मोदक बनवण्यापेक्षा या गणेशचतुर्थीला हटके मोदक ट्राय करुन पाहा.
यंदा बाप्पासाठी पान गुलकंद मोदकांचा नैवेद्य दाखवा. अगदी १०- १५ मिनिटांत हे मोदक तयार होतात. पाहा ही सोप्पी रेसिपी
खायची पाने/ विड्याची पाने- ६, तूप, पिठीसाखर,गुलकंद, कन्डेन्स मिल्क, खवलेला नारळ, खायचा रंग, टुटी-फ्रुटी
सर्वप्रथम खायची पाने आणि पिठीसाखर एकत्र मिक्सरमधून बारीक करुन घ्या. त्यानंतर एका भांड्यात कन्डेन्स मिल्क आणि बारीक केलेली खायची पाने मिक्स करा.
एका पॅनमध्ये दूध, मिल्क पावडर, नारळ, पिठीसाखर टाकून मध्यम आचेवर व्यवस्थित ढवळून घ्या. मिश्रण जाड होईपर्यंत शिजवून घ्या. आता या मिश्रणात बारीक केलेल्या पानांचे मिश्रण आणि थोडा फूड कलर टाकून गॅस बंद करुन घ्या
आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवून द्या. मिश्रण थंड झाल्यानंतर मोदकाचा साचा वापरून त्यात मिश्रण भरून घ्या.
मोदकाच्या साच्यात हे मिश्रण भरत असताना मध्येच थोडा खड्डा करुन त्यात गुलकंद भरा व व्यवस्थित मोदकाचा आकार द्या. त्यानंतर तुमचे पान-गुलकंद मोदक तयार होतील