Ganesh Chaturthi 2023

गणराया आणि 21 अंकाचे काय संबंध? शास्त्र काय म्हणतं

भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला महासिद्धीविनायकी चतुर्थी असं म्हणतात. रविवारी किंवा मंगळवारी ती आल्यास त्याला अधिक महत्त्व प्राप्त होतं.

पंचांगानुसार यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर मंगळवारी आहे. त्यामुळे प्रिय तिथीला चतुर्थी आल्यामुळे त्याला वरद चतुर्थी आणि शिवा चतुर्थी असं म्हणतात.

गणरायाला काहीही अर्पण करतांना ते विषम संख्येत अर्पण करावे असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. विषय संख्या ही शक्तीचं प्रतिक मानलं जातं.

म्हणून गणरायाला 21 दूर्वा किंवा 21 मोदक अर्पण केले जातात. 21 हा आकडा संख्याशास्त्रानुसार 2 अधिक 1 बरोबर 3 असा आहे.

गणपती तीन या आकड्याशी संबंधित आहे. तीन हा आकडा कर्ता, धर्ता या बरोबर हर्ताही आहे.

गणेशाला प्रिय 21 पत्री, मधुमालती,माका, बेलपत्र, दूर्वा,धोतरा, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेर, मंदार, अर्जुन, विष्णुकांत, डाळींब, देवदार, मरवा, पिंपळ, जाई, केवडा, हादगा, बोर या वनस्पती औषधी वनस्पती म्हणून देखील ओळखल्या जातात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story