गणेश विसर्जनला 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

वर्षभर होईल पैशांची बरसात

Sep 27,2023


बाप्पाला निरोप देताना काय करु नये आणि काय करावं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.


बाप्पाचं विसर्जन करताना गणरायची पाठ बघू नका, असं केल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकतं.


गणेश मूर्तीचं पाण्यात विसर्जन करताना बाप्पाचा चेहरा आपल्या कडे असावा. त्याशिवाय गणरायाच्या मूर्तीच्या पाठीमागे कोणी उभं नसावं.


आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी गणरायाचा चरणी एक सुपारी स्पर्श करुन आपल्यासोबत घरी घेऊन या. त्यानंतर ती सुपारी दररोज आपल्या घराच्या उंबरठ्याला स्पर्श करुन तिजोरीत ठेवा.


गणरायाचे विसर्जन करण्यापूर्वी हळद, कूंकू, अक्षता, दूर्वा वाहून आरती करून पूजा करा. नंतर त्यांच्यापुढे हात जोडून आपल्या चुकांसाठी क्षमा मागा.


बाप्पाला निरोप देताना प्रार्थना करा की, गौरी पूत्र गणेश आम्ही तुमचं विसर्जन करत आहोत, तुम्ही आम्हाला सुख, समृद्धी आणि शांती देऊन जा आणि आमच्या घरातील संकट, कहल तुमच्यासोबत घेऊन जा.


गणेश विसर्जनाला जाताना काळे कपडे परिधान करु नका. व्यसन करु नका. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story