Garuda Purana : 'या' लोकांच्या घरी कधीही करू नका जेवण; कारण जाणून तुम्हीसुद्धा

हिंदू धर्मात अनेक ग्रंथ आणि पुराणं आहेत. यातील एक आहे गरुड पुराण. यात मानवाला जीवनातील सुखी जीवनाचे मूलमंत्र दिले गेले आहेत. यात सांगितलं आहे की, काही लोकांकडे चुकूनही जेवण करु नयेत.

रागीट आणि संतप्त व्यक्तीच्या घरी जेवू नये असं गरुड पुराणात सांगण्यात आलंय. या लोकांकडे जेवल्यास त्या व्यक्तीचे गुण आपल्यामध्ये येतात.

गुन्हेगारांच्या घरी कधीही अन्न खाऊ नये, कारण तुम्हीही त्यांच्या पापात सहभागी होतात. त्याशिवाय त्यांचे वाईट विचारांचा प्रभाव आपल्यावर होतो, असं गरुड पुराणात सांगण्यात आलं आहे.

गरुड पुराणानुसार सामान्य माणसाने कधीही किन्नरांच्या घरी जेवू नये. किन्नर हे चांगले आणि वाईट दोन्ही असतात. पण हे ओळखणं कठीण असतं म्हणून त्यांच्यातील नकारात्मक विचार आपल्यावर येऊ शकतात.

गरुड पुराणानुसार इतरांना दुखावणाऱ्या किंवा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या घरात कधीही चुकूनही जेवू नका. अशा व्यक्तींना क्रूर मानलं जातं असून तुमच्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होतो.

आजारी व्यक्तींच्या घरी कधीही जेवू नये कारण तुम्हीदेखील आजारी पडू शकता, असं गरुड पुराणात सांगण्यात आलंय. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story