भारतात अनेक दशकांपासून विक्रम संवतानुसार हिंदू दिनदर्शिकेचा वापर केला जातो.
चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षाच्या प्रतिपदेपासून हिंदू नववर्ष 2082 ची सुरुवात झाली आहे.
भारतामध्ये इंग्रजी म्हणजेच ग्रेगोरियन दिनदर्शिकाच वापरली जाते. म्हणजेच जगभरातील बहुतांश देशांप्रमाणे जानेवारी ते डिसेंबर हेच महिने सरकारी कामकाजासाठी वापरले जातात.
भारतात आता हिंदू दिनदर्शिका दैनंदिन कामकाजात वापरत नाहीत. मात्र आजही जगात असा एक देश आहे जिथे हिंदू दिनदर्शिका अगदी सरकारी कामातही वापरली जाते.
ज्या देशाबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे, नेपाळ! हा भारताचाच शेजारी देश आहे.
हिंदू दिनदर्शिकेला अधिकृत मान्यता देणारा नेपाळ हा जगातील एकमेव देश आहे.
नेपाळमधील सरकारी आणि प्रशासकीय कामांमध्ये हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे तारखांचा उल्लेख केलेला असतो.
नेपाळमध्ये सर्वात आधी 1901 साली हिंदू दिनदर्शिकेचा वापर करण्यात आला.
राणा वंशाने विक्रम संवतला कालगणनेसाठी अधिकृत मान्यता दिली आणि तेव्हापासूनच ही पद्धत सुरु झाली.
वैशाख महिन्यातील पहिला दिवस हा नेपाळमधील नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो.