Gudi Padwa 2025 : गुढीला ‘या’ रंगाची साडी चुकूनही नेसवू नका; अन्यथा...
महाराष्ट्रात चैत्र प्रतिपदा तिथीला मराठी नवं वर्षाची सुरुवात केली जाते.
चैत्र प्रतिपदेच्या दिवशी महाराष्ट्रात गुढी उभारण्याची परंपरा आहे.
दाराबाहेर अंगणात किंवा दारात उंच अशी गुढी उभारली जाते.
या गुढीला साडी नेसवली जाते. पण गुढीला कोणत्या रंगाची साडी शुभ असते किंवा कोणत्या रंगाची साडी अशुभ आहे हे जाणून घ्या.
गुढीला कायम नवी कोरी न धुतलेली साडी नेसावी. कोणी आपल्याला ओटीमध्ये भरलेली साडी चुकूनही नेसवू नयेत.
गुढीला तुम्ही केशरी, लाल, पिवळा आणि हिरवा रंगाची साडी नेसू शकता. मात्र पांढऱ्या किंवा काळा रंगाची साडी नेसवू नयेत.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)