Guru Purnima 2023

गुरूपौर्णिमेच्या दिवशी कुणाला आहे समृद्धीचा योग?

मेष

धार्मिक कार्यात मनं रमणार आहे. अविवाहितांच्या आयुष्यात जोडीदारीची एन्ट्री होणार.

वृषभ

कार आणि घर खरेदीचे योग आहेत. उत्पन्नापेक्षा खर्च वाढणार आहे.

मिथुन

धार्मिक कार्यातून घरातील वातावरण आनंदी असेल. पती पत्नीचं नातं मजबूत होणार आहे.

कर्क

व्यावसायिकांना फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. घरात आनंदाचं वातावरण असणार आहे.

सिंह

गुरुपौर्णिमा या राशीसाठी शुभ आहे. दान धर्म केल्यामुळे फायदा होईल. परदेशवारीचे संधी मिळणार आहे.

कन्या

या लोकांनी आज दान आणि जप करण्यावर भर द्यावा. गुरुपौर्णिमेचा दिवस समाधानकारक असले.

तूळ

अविवाहित लोकांचे लग्न ठरेल. जोडीदारासोबत प्रेमसंबंध घट्ट होतील. अडकलेली कामं पूर्ण होईल.

वृश्चिक

हाता घेतलेली कामं सहज पूर्ण होतील. आजचा व्यवासायिकांसाठी फलदायी आहे. दान केल्यास पूण्य मिळेल.

धनु

या राशीसाठी गुरुपौर्णिमा अत्यंत शुभदायक आहे. दानधर्म आणि गुरुची सेवा केल्यामुळे तुमचं नशिब उजळणार आहे. मेहनतीचं फळ मिळणार आहे.

मकर

घरामध्ये शुभकार्य ठरणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. कामानिमित्त बाहेर जाण्याचे योग आहेत.

कुंभ

कामाच्या ठिकाणी आज तुमचं कौतुक होणार आहे. तुमच्या कर्तुत्वाला वाव मिळेल अशी जबाबदारी तुम्हाला देण्यात येणार आहे. यश आणि प्रगती तुमचं नशीब उजळणार आहे.

मीन

आर्थिक बाबतीत हा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे. तुमचं बँक बॅलेन्स मजबूत होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story