हरियाली अमावस्येला 3 शुभ संयोग, 'या' झाडाची पूजा केल्या प्राप्त होतं पुण्य
श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्या तिथीला हरियाली अमावस्या असं म्हणतात. यंदा हरियाली अमावस्येला 3 शुभ संयोग जुळून आले आहेत.
पंचांगानुसार हरियाली अमावस्या तारीख 16 जुलैला रात्री 10:08 वाजता सुरू होणार असून 18 जुलैला सकाळी 12:01 पर्यंत असणार आहे.
उदय तिथीनुसार हरियाली अमावस्या 17 जुलैला साजरी करायची आहे. यादिवशी स्नान आणि दान केल्यास पुण्य प्राप्त होतं.
हरियाली अमावस्या सोमवारी असल्याने ती सोमवती अमावस्या म्हटली जाते. याशिवाय उत्तर भारतीयांचा सोमवारी दुसरा श्रावण सोमवार आहे.
त्याशिवाय या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगचा सुंदर योग जुळून आला आहे. 18 जुलैला सकाळी 05:11 ते 05:35 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे.
श्रावणात पावसामुळे निसर्गाचं सुंदर आणि चोहूबाजूला हिरवळ असते. त्यामुळे या अमावस्येला हरियाली अमावस्या असं म्हणतात.
हरियाली अमावस्येला पिंपळाच्या झाडाला महत्त्व आहे. या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाला दूध आणि जल अर्पण केल्या देवता आणि पितरांची कृपा बरसते.
हरियाली अमावस्येच्या दिवशी तुम्ही रोपे लावून तुमचे नशीब पलटवू शकता.
हरियाली अमावस्येच्या दिवशी पीपळ, कडुनिंब, केळी, वड, तुळशी, आवळा इत्यादी दिव्य वनस्पती लावणे शुभ मानले जाते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)