यावर्षी रंगाचा उत्साह होळी सण 14 मार्चला साजरा करण्यात येणार आहे. यानंतक पापी ग्रह राहू आणि केतू नक्षत्र बदल करणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार 16 मार्चला संध्याकाळी राहू केतू पूर्वा भाद्रपद आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
होळीनंतर राहू केतू नक्षत्रात होणारा हा बदल तीन राशींसाठी अत्यंत अशुभ मानला जात आहे. त्यांचा अशुभ प्रभाव 15 दिवस राहणार आहे.
कामाच्या ठिकाणी तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. वैवाहिक जीवनावरही विपरीत परिणाम होणार आहे. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. दुखापती आमि अपघातांपासून सावधगिरी बाळगा. आरोग्याच्या समस्यांवर जास्त पैसे खर्च होणार आहे.
व्यावसायिक जीवनात आवांछित बदल होणार आहेत. तुम्हाला तुमची नोकरी बदलण्यास भाग पाडलं जाणार आहे. अचानक नोकरीत बदली होऊ शकते. राहू आणि केतूच्या नक्षत्रातील बदल तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. पैसे कमवण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागणार आहे. दर्जेदार कामावर लक्ष केंद्रित करा.
व्यवसायात अचानक नुकसान होऊ शकतं. कर्ज म्हणून दिलेले पैसे पाण्यात जाऊ शकतो. या काळात गुंतवणूक योजनांपासून दूर राहणेच चांगले राहील. आजारपणा, दुखापत किंवा अपघात यासारख्या समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक ताणतणावाचा सामान करावा लागेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)