कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरा पौर्णिमा, देव दिवाळी...या दिवशी श्री गणराया, भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची देवा लावून पूजा केली जाते. असं म्हणतात या दिवशी देव दिवाळी साजरा करतात. मग देव दिवाळी नेमके किती दिवे लावावे?
कार्तिक पौर्णिमेला दीपदान आणि तुळशीचं लग्न लावलं जातं. यादिवशी देवांची पूजा केल्यास घरात धनसंपदा कायम राहते.
पौराणिक कथेनुसार शंकर देवाने या दिवशी त्रिपुरासुर राक्षसाचा वध करुन देवतांना स्वर्गात परत आणले होते. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करण्यात येते
कौर्तिक पौर्णिमेला शंकर देवाला फुलं, नैवेद्य आणि बेल अर्पण करावं आणि संध्याकाळी दिवे लावावेत.
पिठाचे 11, 21, 51, 108 दिवे नदी काठी, तलावाजवळ हे दिवे लावण्याची परंपरा आहे. तुम्ही विहिरीजवळही दिवे लावू शकतो.
शहरात घरच्या घरीदेखील तुम्ही दिवे लावू शकतो. घरात एका कोपऱ्यात पाण्याने भरलेल्या भांड्याजवळ हे दिवे तुम्ही लावू शकता. देव दिवाळीला संध्याकाळी 05:08 ते 07:47 या शुभ मुहूर्तावर दिवे लावा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)