सुख, यशाबरोबर समाधानही हवे असेल तर आजपासून करा 'ही' कामं!
Jan 30,2024
चाणक्यनितीमध्ये मानवी आयुष्याला अनेक बाजूंने विचार करुन सुखी जीवनाचे रहस्य सांगितले आहेत.
चाणक्यनितीमध्ये सांगितलेल्या नियमांचा पालन केल्यास आपल्या आयुष्यात सुख, प्रगतीसोबत समाधान मिळेल.
विनाकारण संबंध नसतानाही वाद घालून नका आणि वादात अडकू नका. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.
चाणक्य म्हणतात स्वाभिमान असावा पण अभिमान नको. अहंकाराला खतपाणी न घालता कलागुणांना वाव द्या.
स्वार्थ हे माणसाला लाचार बनवतो. स्वार्थी माणूस कधी दुसऱ्यांचा विचार करत नाही आणि वेळप्रसंगी तो एकटा पडतो.
क्रोधावर नियंत्रण ठेवल्यास आयुष्यात समाधान राहतं. राग हा तुमच्यामधील उणी बाजू दाखवतो. एका शब्दाने तुम्ही आजपर्यंत कमावलेल्या चांगुलपणा गमावून बसतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)