मंदिरात जेव्हाजेव्हा जाणं होतं तेव्हातेव्हा घंटानाद कायमच कानांवर पडतो.
अनेकजण मंदिरात प्रवेश करताच तिथं असणारी घंटा वाजवतात. पण, तिथं घंटा का असता हे तुम्हाला माहितीये? यामागे अध्यात्मिक आणि शास्त्रीय अशी दोन्ही कारणं आहेत.
धार्मिक मान्यतांनुसार मंदिरात घंटानादामुळं तिथं स्थापित देवदेवतांच्या मूर्ती सचेत होतात.
घंटानादामुळं नकारात्मक उर्जा नाहीशी होते.
शास्त्रीय कारणानुसार घंटानादामुळं आजुबाजूच्या वातावरणात कंपनं उत्पन्न होतात.
वातावरणामुळं ही कंपनं दूरवर जातात. ज्यामुळं त्या क्षेत्रात असणारे जीवाणू, विषाणू आणि सूक्ष्म जीव नष्ट होतात.
मंदिरात घंटा असण्यामागे धार्मिक आणि शास्त्रीय अशी दोन्हीही कारणं आहेत.