मांजर आडवं जाणं अशुभ? कितपत सत्य आहे हे मिथक?
कुत्रा आणि मांजर हे प्राणी लोकांना खूप आवडतात.
आपल्या आजूबाजूला अनेकांकडे कुत्रा आणि मांजरी पाळलेल्या असतात.
पण तुम्हाला माहितीये मांजर आडवं गेलं की ते अशुभ मानणारी एक पिढी आपल्याकडे आहे.
जर मांजर आडवी गेली की, लोक तो मार्ग सोडतात की त्या मार्गावरून दुसरं कोणी जातं हे पाहतात.
पण खरंच मांजरांनी रस्त्यातून आडवं जाणे हे अशुभ आहे का?
शतकानुशतके लोक मांजरांना शाप मानत आले आहेत.
ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर म्हणतात की, मांजराचा रस्ता ओलांडणे किंवा आडवं जाणं हे अजिबात वाईट किंवा अशुभ नाही.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)