आपल्याला अनेकदा स्वप्न पडतात. या स्वप्नांचा अर्थ स्वप्नशास्त्रात सांगितले जाते.
स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात युद्ध होताना दिसत असेल तर ते अशुभ लक्षण मानले जाते.
याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुमचे काही काम अडकू शकते किंवा काही अशी घटना घडू शकते ज्यामुळे तुमची चिंता वाढू शकते.
अशी स्वप्ने तुम्हाला भविष्यात येऊ शकणाऱ्या आव्हानांबद्दल सूचित करतात.
पण जर तुम्हाला स्वप्नात लढाऊ विमान दिसले तर ते शुभ मानले जाते.
या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमचे गोष्टींवर नियंत्रण असेल आणि तुम्ही प्रत्येक परिस्थितीत विजयी व्हाल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)