आर्थिक संकटावर मात करण्यासाठी

जन्माष्टमीला करा मोराच्या पिसांसंबंधी उपाय

Sep 04,2023


भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते. भगवान कृष्णाची जयंती म्हणून साजरी केली जाते.


शास्त्रानुसार श्रीकृष्णाचा जन्म हा रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यामुळे गृहस्थ जीवन जगणारे भक्त 6 सप्टेंबरला तर वैष्णव पंथांची लोक 7 सप्टेंबरला साजरा करणार आहेत.


ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही सतत आर्थिक संकटाने घेरलेले असता तर जन्माष्टमीच्या दिवशी उपाय सांगितले आहेत.


तुमच्या घरात वास्तुदोष असल्यास जन्माष्टमीच्या दिवशी घरात मोराचे पिस आणा. श्रीकृष्णासोबत मोराच्या पिसांचं पूजन करा आणि मग ते पिस घराच्या पूर्व दिशेला ठेवा.


पती - पत्नीमधील वादविवाद नाहीसा करण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी बेडरूममध्ये मोराची पिसं घेऊन पूर्व किंवा उत्तरेच्या भिंतीवर लावा.


कुंडलीतील राहू केतूचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी बेडरुमच्या पश्चिमेकडील भिंतीवर मोराचे पिसं लावा.


आर्थिक संकटावर मात करण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी पाच मोराची पिसे घरी आणा. श्रीकृष्ण आणि मोराची पिस यांची पूजा करा. आता 21 दिवस ते मोर पिस पूजा स्थानी ठेवा. आता पुढील 21 दिवस हे मोर पिस पैसे जिथे ठेवतात तिथे ठेवा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story