घरात मोरपिस ठेवल्याने होईल भाग्योदय, पण कोणत्या दिशेला लावावे?

आपण मोरपिसाचा वापर घरात शोभेसाठी करतो. आकर्षक रंगांमुळं मोरपिस घरात शोभून दिसते. मात्र, वास्तुशास्त्रानुसार घरात मोरपिस ठेवण्याचे फायदेही आहेत.

मोरपीस घरात ठेवल्याने भाग्योदय होऊ शकतो. पण ते योग्य दिशेला ठेवणे गरजेचे आहे. घरातील कोणत्या दिशेला मोरपीस ठेवणे शुभ असते जाणून घेऊया.

मोरपंख घरात ठेवल्याने आर्थिक चणचण कमी होऊन स्थिरता येते.

घराच्या पूर्व दिशेला मोराचे पिस ठेवणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या कुंडलीत राहु दोष आहे त्यांनी मोराची पिसे उत्तर-पश्चिम दिशेला लावावीत

घरातील सर्वांना दिसतील अशा जागी मोरपीस ठेवावे. यामुळे घरात सकारात्मक अनुभव येतील.

लक्षात ठेवा घरातील देवघरात कधीच मोरपंख ठेवू नये, त्यामुळं घरात नकारात्मक उर्जा निर्माण होतील.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story