मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात नक्की करा ही कामं; गरिबी घरातून जाईल पळून

सर्वात खास दिवसांपैकी एक

सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत म्हटलं जातं. मकर संक्रातीचा दिवस हा वर्षातील सर्वात खास दिवसांपैकी एक असतो.

मकर संक्रांत 15 जानेवारीला

सूर्य 15 जानेवारी रोजी मध्य रात्री 2 वाजून 54 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळेच मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरी केली जाईल.

पुण्यकाळात साजरी करा

मकर संक्रांत पुण्यकाळात साजरी करणं लाभदायक मानलं जातं. त्यामुळे 15 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजून 14 मिनिटांपासून सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांमध्ये स्नान, ध्यान आणि दानधर्म करावं.

दारिद्र्य दूर होण्यास होते मदत

ज्योतिष शास्त्रातील तज्ज्ञांनुसार मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर काही विशेष उपाय केल्यास दारिद्र्य दूर होण्यास आणि घरात सुख-संपत्ती नांदण्यास मदत होते.

सूर्याला अर्घ्य द्यावे

मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी अंघोळ केल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यानंतर सूर्य आणि शनिच्या मंत्रांचा जप करावा. गीतेचं पठण करावं. असं केल्यास दारिद्र घरात येत नाही.

गायीला चारा खाऊ घाला

गायीमध्ये देवी-देवतांचा वास असतो. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी गायीला चारा खाऊ घाला. त्यामुळे घरात लक्ष्मीसहीत सर्व देव वास करतात.

या गोष्टी दान करा

मकर संक्रातीच्या पुण्यकाळात अन्न, गुळ, तिळ आणि तूप दान करावे. पुण्यकाळ हा सकाळी 7.14 पासून सायंकाळी 5.45 पर्यंत आहे.

पिपंळाचं झाड लावा

मकर संक्रांतीच्या दिवशी पिंपळाचं झाड लावावं. जेवणात खिचडी करावी. देवाला याचा नैवद्य दाखवावा आणि तो प्रसाद म्हणून वाटावा.

ज्योतिष शास्त्रावर आधारित माहिती

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

VIEW ALL

Read Next Story