अडकलेले पैसे, कौटुंबिक कलह, आर्थिक संकट अन् प्रेम प्रकरण...; ज्येष्ठ पौर्णिमेला करा हे अचूक उपाय!
ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी अतिशय खास मानली जाते.
महाराष्ट्रात ज्येष्ठ पौर्णिमेला महिला पतीच्या दीर्घयुष्यासाठी वडाची पूजा करतात.
ज्येष्ठ पौर्णिमा तिथी मंगळवार 10 जूनला सकाळी 11.35 वाजेपासून बुधवारी 11 जून दुपारी 1.13 वाजेपर्यंत असणार आहे. ज्येष्ठ पौर्णिमा 11 जूनला साजरी करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ पौर्णिमेला तुळशीचे उपाय केल्यास अनेक समस्यातून आराम मिळतो, असा विश्वास ज्योतिषशास्त्रातून करण्यात आला आहे.
कुटुंबात सतत कहल असेल तर घरात शांती, आनंद आणि समृद्धीसाठी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी एक नवीन तुळशीचे रोप आणा आणि ते उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला लावा.
व्यवसाय किंवा नोकरीत अडचणी येत असेल तर तुळशीची एक फांदी पिवळ्या कापडात बांधा आणि जिथे तुम्ही पैसे ठेवतात तिथे ठेवा.
तुळशीची पूजा दररोज करा. पण ज्येष्ठ पौर्णिमेला सकाळी तुळशीची 11 पानं तोडून घ्या. ही पानं लाल कापडात बांधून दाराच्या चौकटीवर लटकवा. या उपायामुळे आर्थिक संकट दूर होतं.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)