राण्यांची ‘ती’ एक मागणी पूर्ण करण्यासाठी मुघल सम्राटला फुटायचा घाम
मुघल सम्राच त्यांच्या राजेशाही छंदांसाठी देखील ओळखले जात होते. ते त्यांच्या राण्यांवर भरपूर पैसा खर्च करायचे
मुघल सम्राट त्यांच्या राण्यांना उदार मनाने गिफ्ट देत होते. त्यात महागड्या भेटवस्तू, दागिने आणि परदेशातून मागवलेल्या इतर वस्तूंचा समावेश असायचा.
राण्याही राजांना त्यांच्या इच्छा सांगत असायच्या. मुघल सम्राट त्या आनंदाने पूर्ण करायचे.
लेखिका इरा मुखोटी यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलंय की, मुघल सम्राट त्यांच्या राण्यांच्या विशेष मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्व व्यवस्था करायच्या.
मुघल राण्यांना विशेषत: सुंदर फुलांच्या गजरांची आवड होती आणि त्यासाठी मुघल सम्राटकडून दुर्मिळ फुलं मागायच्या.
राजांना ही दुर्मिळ ताजी फुलं मिळवणे कठीण होतं. कारण बऱ्याचगा ही फुलं उष्णतेमुळे खराब होत असतं.
तरीदेखील शाहजहां आपल्या राण्यांसाठी काश्मीरमधून सुंदर फुलं पाण्यात टाकून मागवत असे.
बेगमांशिवाय हजारो महिला हरममध्ये राहत होत्या. अनेक वेळा मुघल सम्राट आपल्या खास दासींनाही भेटवस्तू देत असे.