हिंदू धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम बनवलेले आहेत. या नियमांपैकी एक म्हणजे आंघोळीबद्दल सांगितलेल्या गोष्टी.
सर्वसाधारण व्यक्तींना शास्त्राचे पालन करायला हवे तरच सुख, समृद्धी आणि शांती नांदते असे शास्त्रात म्हटले आहे.
कधीही कपड्यांशिवाय म्हणजेच नग्नावस्थेत आंघोळ करू नये, असे वडिलधारी सांगतात. दरम्यान ज्योतिष तज्ञ डॉ. राधाकांत वत्स यांनी शास्त्रात लिहिलेल्या या गोष्टी, कारणांबद्दल माहिती दिली आहे.
पौराणिक कथांनुसार निर्वस्त्र स्नान करणे निषिद्ध मानले आहे. यामध्ये निर्वस्र स्नान करणाऱ्या गोपिकांचे कपडे बाळकृष्णाने लपवल्याची अख्यायिका सांगितली जाते.
निर्वस्र स्नान केल्याने शरीर आणि मनात नकारात्मकता येते. त्यामुळे आंघोळ करताना काहीतरी कपडा असावा, असा सल्ला पुराणात दिला जातो.
पद्मपुराणानुसार, आंघोळीचे पाणी पुर्वजांच्या वाट्याला जाते. निर्वस्त्र आंघोळ म्हणजे पुर्वजांसमोर विना कपडे आंघोळ मानली जाते.
शास्त्रानुसार, निर्वस्त्र आंघोळ केल्याने लक्ष्मी माता नाराज होते. कुंडलीत धन हानी योग येतो आणि आर्थिक नुकसान होते.
गरुड पुराणानुसार निर्वस्त्र आंघोळ केल्यास पितृदोषाचा त्रास होतो. यामुळे पितर नाराज होतात.
नग्नावस्थेतच आंघोळ केल्यास प्रामुख्याने पाण्याची देवता वरुणाचा अपमान करण्यासारखे आहे. नग्न आंघोळ केल्याने पाप होऊ शकते, असे शास्त्रात म्हटले आहे. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)