यावर्षी 21 ऑगस्टला नागपंचमी साजरी केली जाणार आहे. प्रत्येक वर्षी शुक्ल पक्षाच्या पंचम तिथीत हा सण येतो.
पंचांगनुसार, यावर्षी नागपंचमीला 2 अत्यंत शुभ आणि शुक्ल योग असणार आहे.
अशा स्थितीत, नागपंचमीला काही खास उपाय केल्यानंतर आर्थिक संकटातून सुटका होईल. याबद्दल जाणून घ्या.
ज्योतीषतज्ज्ञांच्या माहितीनुसार. नागपंचमीच्या दिवशी कुलदैवतासह नागदेवताची पूजा करा. त्यांना खीर प्रसाद म्हणून द्या.
आर्थिक समस्यांपासून सुटका करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर गाईच्या शेणात तांदूळ, दुर्वा लावा. असं करणं शुभ मानलं जातं.
नागपंचमीला 'नाग गायत्री' मंत्राचा जप करणंही फार फायदेशीर मानलं जातं. या मंत्राचा 108 वेळा जप केल्यास भयातून मुक्तता होते.
नागपंचमीला भगवान शंकर आणि त्यांच्या गळ्यातील वासुकी नागाचीही पूजा करा. असं केल्याने घरात नेहमीच भरभराट राहील.
नागपंचमीला चुकूनही जमिनीत खोदकाम करु नका. तसंच या दिवशी नागाला दूध पाजण्याऐवजी माती किंवा धातूच्या मूर्तीची पूजा करा.