दान देणे शुभ मानलं जातं असं म्हणतात डाव्या हाताने दिलेले दान उजव्या हातालादेखील कळू नये. तसंच, दान देणाऱ्या व्यक्तींकडे कधीच पैशांची चणचण भासत नाही.
मात्र, आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या कुवतीपेक्षा जास्त दान देणे योग्य नाहीये.
चाणक्य नितीनुसार, दान देण्यापूर्वी आपल्याकडे तितकी क्षमता आहे का? हे पाहणे गरजेचे आहे.
जे लोक कोणताही विचार न करता दान देण्याच्या प्रयत्नात स्वतःकडील असलेले सर्वकाही खर्च करुन टाकतात. त्या लोकांवर संकटं येते.
आचार्य चाणक्य म्हणतात की, एका व्यक्तीला जेवढे शक्य आहे तितकेच दान त्याने द्यावे.
इतिहासात अशी अनेक उदाहरण आहेत ज्यांनी दान देण्याच्या सगळं काही गमावले आहे. व नंतर ते भिखाऱ्यासारखे जीवन जगत आहेत.
दान देत असताना तुमच्याकडील धन-संपत्तीवर आधीच लक्ष देणे गरजेचे आहे.