कधीही समाधानी नसतात 'या' राशींचं लोकं, नेहमी दु:खी असतात...

Dec 26,2023


ज्योतिषशास्त्रानुसार 5 राशींचे लोक कधीही समाधानी नसतात आणि नेहमीच दु:खी राहतात. यातून तुम्ही तर नाही ना...

मेष (Aries)

मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्यामुळे या राशीच्या व्यक्ती खूप साहसी आणि उत्साही असतात. हे लोक खूप महत्त्वाकांक्षी असल्याने ते नेहमी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टींमध्ये ते कधीही आनंदी आणि समाधानी राहत नाही.

कन्या (Virgo)

कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. ते खूप रहस्यमयी स्वभावाचे असतात. त्यांच्या मनात आणि ओठांवर काही वेगवेगळे असते. ते कधीही आयुष्यात समाधानी नसतात. त्यांना नेहमी इतरांजवळ असलेल्या गोष्टींविषयी जास्त आकर्षण असते.

मकर (Capricorn Zodiac)

मकर राशीचा स्वामी ग्रह शनी असल्याने या लोकांच्या खूप जास्त अपेक्षा असतात. ते व्यक्ती नेहमी प्रत्येक गोष्टीत चुका शोधत असतात. त्यामुळे त्यांच्या मनाप्रमाणे काहीही होत नसल्याची जाणीव त्यांना कायम दु:खी ठेवतात.

मिथुन (Gemini)

मिथुन राशीचे लोक नेहमी दु:खी राहतात. आपण काय करीत आहोत यापेक्षा इतर लोक काय करीत आहेत याकडेच त्यांचं जास्त लक्ष असल्याने ते दु:खी असतात. त्यांना इतरांचा हेवा वाटतो कायम. त्यामुळे ही लोक कधीही आनंदी नसतात.

मीन (Pisces Zodiac)

मीन राशीचा स्वामी ग्रह गुरू असल्याने या राशीची व्यक्ती नेहमी अस्वस्थ असतात. हे लोक आपल्याच विश्वात रमतात. ज्यामुळे ते अनेकदा काही गोष्टींचा पूर्णपणे आनंद घेतात. मीन राशीच्या व्यक्ती कधीही समाधानी नसतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story