'या' 3 तारखांना जन्मलेले लोक असतात खूप श्रीमंत!

ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र.

अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांक किंवा भाग्यांकावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण-वैशिष्ट्ये, भविष्यकथन केले जाऊ शकते.

अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म 3, 12, 21 किंवा 30 या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक 3 आहे. गुरु हा मूलांक 3 चा स्वामी आहे.

मूलांक 3 असलेल्या व्यक्ती व्यवसायात खूप पुढे जातात, असे म्हटले जाते. मूलांक 3 असलेले लोक कलात्मक विचार आणि ज्ञानाने व्यवसायाला एक नवीन आयाम देतात.

मूलांक 3 असलेल्या व्यक्ती साहसी असतात. या व्यक्तींमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते.

मूलांक 3 असलेल्या व्यक्ती मोकळ्या मनाच्या आणि स्वभावाच्या असतात. जीवन स्वातंत्र्याने जगणे आवडते. स्वभावाने या व्यक्ती शांतताप्रिय, मृदुभाषी आणि सत्यवादी असतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story