हंपीच्या विठ्ठल मंदिरातून पांडुरंग पंढरपुरात का आले?
सावळ्या विठुरायाचे भक्त अख्खा जगात पसरले आहेत. पंढरपुराची माऊली अख्खा जगाची माऊली आहे. कर्नाटकाशी असलेले नात आज आपण पाहणार आहोत.
वारकरी संप्रदायाचा वारी सावळा विठुरायाचा हंपी शहराशी संबंध आहे तुम्हाला माहिती आहे का?
भारताच्या कानाकोपऱ्यात पांडुरंगाची अनेक मंदिर आहेत. त्यातील हंपीमधील विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे.
हे मंदिर राजा कृष्णदेवराय यांच्या राज्यात 15व्या शतकात बांधण्यात आलं आहे. कृष्णदेवराय ही विठ्ठलाचे परमभक्त होते.
हंपीतील विठुराया पंढरपुरात आले. हे तुम्हाला माहिती आहे का? यामागे एक आख्यायिका आहे.
असं म्हणतात की सावळ्या विठुरायाने कृष्णदेवराय यांच्या स्वप्नात आले होते. तेव्हा पांडुरंग म्हणाले की, आपली मूर्ती पंढरपुरात स्थापन करा.
एक अजून आख्यायिका आहे, त्यानुसार विठ्ठल हे भगवान विष्णूचा अवतार होते त्यांसाठी हे मंदिर बांधण्यात आले होते.
हंपीमधील हे मंदिर एका भव्यदिव्य राजमहालासारखे होते म्हणून विठुराया पुन्हा स्वगृही परतले.
म्हणून हंपीच्या मंदिरात विठोबाची मूर्ती नाही. हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे.
हंपीमधील विठ्ठल मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून दर्जा मिळाला आहे.
हंपी हे कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातले सुंदर असं शहर आहे.