मृत्यूआधी मिळतात 'हे' 3 संकेत; गरुड पुराणात केला आहे उल्लेख

Shivraj Yadav
Jun 06,2025


जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे. हा निसर्गाचा नियम असून, स्वत: देवानाही मानवाच्या रुपात असताना तो स्विकारला आहे.


जेव्हा जेव्हा देवाने माणसाचं रुप घेऊन पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा मृत्यूचक्र त्यालाही चुकलं नाही.


गरुड पुराणात सांगितल्यानुसार, आपल्या अंतिम क्षणांमध्ये व्यक्तीला काही विचित्र अनुभव येतात.


असं म्हणतात की, मृत्यूआधी व्यक्तीला त्याचे संकेत मिळू लागतात. गरुड पुराणनुसार हे नेमके कोणते संकेत आहेत हे जाणून घेऊयात.

पाप, पुण्याची आठवण

मृत्यू जवळ आल्यानंतर व्यक्तीला आपल्या आयुष्यातील पाप, पुण्य आठवू लागतं. सगळा लेखाजोखा त्याच्या डोळ्यासमोर फिरु लागतो.


चांगले कर्म दिलासा देतात तर वाईट कर्म भीती आणि पश्चात्तापाची भावना निर्माण करतात.

यमदूताचं दर्शन

असं म्हणतात की, मृत्यूच्या वेळी यमदूताच्या उपस्थितीची जाणीव होऊ लागते. एखादी अदृश्य शक्ती आपल्या आसपास आहे असं वाटू लागतं.


मानलं जातं की, रात्रीच्या वेळी हा अनुभव तीव्र होतो, ज्यामुळे भीती वाटत राहते.

पूर्वजांची स्वप्नं

मृत्यू जवळ आल्यानंतर सतत आपल्या पूर्वजांची स्वप्नं पडू लागतात. स्वप्नात ते आपल्याला बोलवत आहेत असं वाटतं.

VIEW ALL

Read Next Story