पितृपक्षात चुकूनही 'या' 5 गोष्टींचं दान करु नका!

नाहीतर मिळणार नाही पितृदोषातून मुक्ती

पितृपक्षात दान करणे सर्वोत्तम मानलं जातं. पण पितृपक्षात काही गोष्टींचा दान निषिद्ध मानले जाते. या वस्तूंचा दान केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळणार नाही.

पितृ पक्षात तेल दान चुकूनही करु नका. पितृपक्षात तेल दान केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज होतात, असं शास्त्रात सांगण्यात आले आहे. या काळात खासकरुन मोहरीचे तेल दान करू नका.

पितृपक्षात जुने आणि निरुपयोगी कपडे कोणालाही दान करू नका. बूट आणि चप्पल दान करू नका. राहू दोष आणि पितृदोषाचा प्रभाव वाढतो.

पितृ पक्षात अन्नदान शुभ मानले जाते. पण या काळात उष्ट किंवा तुम्ही खाल्लेले अन्न दान करु नका. त्यामुळे पितर नाराज होतात.

पितृ पक्षाच्या काळात भांडी दान करतात. पण लोखंडी भांडी चुकूनही दान करू नका. लोखंडी भांडी दान केल्यास पूर्वज नाराज होतील.

पितृ पक्षाच्या काळात काळ्या रंगाचे कपडे दान करु नका. पितृ पक्षामध्ये पांढर्‍या रंगाचे कपडे दान करणे शुभ मानले जाते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story