आपल्या एका सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये प्रेमानंद महाराजांनी नमाज पठण करणाऱ्यांचं कौतुक केलं आहे.
"एका अन्य धर्माचे लोक रस्त्यावर नमाज पठण करत होते. मी त्यांच्या नियम आणि निष्ठेला प्रमाण करतो," असं प्रेमानंद महाराज म्हणाले.
या व्हिडीओमध्ये प्रेमानंद महाराजांनी, "ईश्वराची प्रार्थना करण्याचा त्यांचा वेळ ठरलेला असतो," हे कौतुकास्पद असल्याचं म्हटलेलं.
"प्रार्थनेची वेळ झाली आणि ते कुठेही असले अगदी प्रवासात असो, कुठे जात असो किंवा इतर ठिकाणी असले तरी ईश्वराची प्रार्थना (नमाज पठण) करतात," असं प्रेमानंद महाराज म्हणालेले.
"त्यांचा ईश्वर भक्तीचा हा गुण खरोखरच वंदनीय आहे," असं प्रेमानंद महाराजांनी म्हटलं.
ते कोणत्याही रुपात देवाची प्रार्थना करोत. देव तर एकच आहे, असंही प्रेमानंद महाराजांनी यावेळी म्हटलं.
मुस्लिम समाजातील लोक दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतात.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)