प्रेमानंद महाराजांच्या सत्संगातील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. इन्स्टाग्राम असो किंवा फेसबुक, प्रेमानंद याचे व्हिडीओ पाहायला मिळतातच.
भक्तांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं प्रेमानंद महाराज देत असताना काढलेले हे व्हिडीओ अनेकजण स्वत:शी जोडून पाहतात आणि शेअर करतात.
अशाच एका व्हिडीओमध्ये प्रेमानंद यांनी योग्य निर्णय कसा घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केलं आहे.
योग्य निर्णय घेताना नेमकं काय केलं पाहिजे की ज्यामुळे नंतर निर्णयाचा पश्चाताप होणार नाही याबद्दल प्रेमानंद यांनी सांगितलं आहे.
कोणताही निर्णय घेण्याआधी 10 मिनिटं शांत बसा आणि आपला कुलदेवतेचं स्मरण करा, असं प्रेमानंद महाराज सांगतात.
या ध्यानस्थ अवस्थेत तुम्ही जो निर्णय घेऊ इच्छित आहात त्याबद्दल मनातल्या मनात विचार करावा, असंही प्रेमानंद सुचवतात.
जे लोक देव नामाचा जप करतात त्यांच्या मनात आपण देवाशी जोडले गेलो आहोत अशी भावना निर्माण होते, असं महाराजांचं म्हणणं आहे.
प्रेमानंद यांच्या सांगण्यांनुसार, कोणताही निर्णय घेण्याआधी देवाचं स्मरण केल्यास योग्य आणि अयोग्य काय हे निवडण्यास मदत होते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून ती केवळ येथे मांडण्यात आली आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)