कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांवर शनी सती राहणार असली, तरी कुंभ राशीचा स्वामी शनि असून या राशीच्या कुंडलीच्या चढत्या घरात शश राजयोग तयार होत आहे. हा योग तुम्हाला प्रगती आणि पैसा देईल. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी शनि संक्रमण वरदान ठरणार आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांची प्रगती होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

तूळ (Libra)

या लोकांचे भाग्यही चमकणार आहे. या लोकांच्या जुन्या समस्या संपतील. प्रगतीचा मार्ग खुला होईल. तुम्हाला जीवनात संपत्ती, समृद्धी आणि आनंद मिळेल.

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. या लोकांना प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. अचानक पैसे मिळणार आहे. व्यवसायामुळे तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागेल. जीवनात सुख-समृद्धी वाढेल.

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांना खूप लाभ होणार आहे. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळणार आहे. प्रमोशन आणि उत्पन्नात वाढ होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

इतके वर्ष असणार 'शश महायोग'!

सध्या शनि स्वतःच्या राशीत कुंभ राशीत आहे. 2025 पर्यंत या राशीत राहून शश राज योग तयार

शनिमुळे बनतोय'शश महायोग'!

पुढील अडीच वर्षे शनि कुंभ राशीत राहणार आहे. यामुळे 5 राशीच्या लोकांना जोरदार लाभ मिळणार आहे.

VIEW ALL

Read Next Story