दरवाजाच्या दिशेने पाय ठेवून झोपणं शुभ की अशुभ?


भारतीय परंपरा आणि मान्यतेनुसार दरवाजाकडे पाय करून झोपणं अशुभ मानलं जातं. भारतात अशा अनेक परंपरा आहेत ज्यांचा दैनंदिन जीवनावर प्रभाव पडत असतो.


भारतीय संस्कृतीत दरवाजाकडे पाय करून झोपल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि यामुळे घरात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.


झोपताना पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला डोके ठेवून झोपणे शुभ मानले जातं. यामुळे व्यक्तीचे आरोग्य आणि आर्थिक चणचण दूर होते.


विज्ञानानुसार दरवाजाकडे पाय ठेवून झोपण्यात काहीही नुकसान होत नाही.पण उत्तरेकडे डोके ठेवून झोपणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य मानले जाते.


याचे कारण असे की पृथ्वीचा चुंबकीय भागाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो.यामुळे उत्तरेकडे डोकं ठेवून झोपल्याने रक्तदाब वाढतो आणि झोपेवरही परिणाम होतो.


एखादी व्यक्ती ज्या दिशेने झोपते त्याप्रमाणे त्याच्या झोपेवर आणि आरोग्यावर परिणाम होत असतो.


पण वैज्ञानिकदृष्ट्या माणसाने अशा प्रकारे झोपले पाहिजे की त्याला चांगली झोप लागेल. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story