कधी विचार केला आहे का, की खाण्यासाठी ज्या गव्हाचा, त्याच्या पिठाचा वापर केला जातो, तोच गहू पुजाविधीदरम्यान का वापरला जात नाही?
तांदळाचा दाणा कायमच अखंडतेचे संकेत देतो. कारण या एका दाण्यातून अनेक तांदळाच्या दाण्यांची निर्मिती होते. जे विकासाचंही प्रतीक आहे.
पूजाअर्चेदरम्यान तांदूळ हे शुभसूचक प्रतीक असून, समृद्धी आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं.
देवदेवतांप्रती भक्ती, आशीर्वाद आणि उत्पत्तीचं प्रतिनिधीत्वं करणाऱ्या तांदळाच्या दाण्याचा वापर प्रसाद म्हणून केला जातो.
गव्हाचा वापर दैनंदिन जीवनातील अन्नपरार्थांमध्ये केला जातो मात्र तो पुजेसाठी वापरला जात नाही.
गव्हाचं पीठ होतं तेव्हा त्याची मूळ संरचना बदलते. मात्र तांदूळ आपल्या नैसर्गिक आणि शुद्ध रुपात अध्यात्मिकता आणि पारदर्शकतेचच प्रतीक ठरतो.
ज्यामुळं नवरात्रोत्सवापासून ते इतर धार्मिक विधी असो, तिथं कायम तांदळाचाच प्राधान्य दिलं जातं, गव्हाला नाही. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)