हिंदू धर्मामध्ये एखादं चांगलं काम करायचं झालं की, मुहूर्त पाहून काम केलं जातं.
ऑगस्ट महिन्यात असेच चांगले शुभ-मुहूर्त आहेत, ते पाहुयात.
अभिजीत मुहूर्त हा अत्यंत शुभ मानला जातो. 28 ऑगस्टला रात्री 9.23 पाहून या मुहूर्ताला सुरुवात होणार असून 29 ऑगस्टला पहाटे 4.08 पर्यंत असणार आहे
नवीन व्यवसाय किंवा नवं काम सुरु करायचं असेल तर ऑगस्ट 23, 24 आणि 27 हे 3 दिवस शुभ आहेत.
23 ऑगस्टला पहाटे 10.40 ते 12.30 पर्यंत, 24 ऑगस्टला सकाळी 6.18 ते दुसऱ्या दिवशी 6.19 पर्यंत मुहूर्त आहे. तर 27 ऑगस्टला सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 पर्यंत मुहूर्त आहे.
नवीन जन्म घेतलेल्या बाळाचं नाव ठेवायचं असेल तर नामकरण मुहूर्त 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5.20 पर्यंत आहे.
तर 8 ऑगस्टला सकाळी 10.30 ते संध्याकाळी 4.30 आणि 31 ऑगस्टला सकाळी 8 ते संध्याकाळी 4.30 पर्यंत आहे.