हिंदू धर्मानुसार घरात तुळस असणे शुभ मानले जाते. तुळसही पवित्र असल्याचीही मान्यता असते.
मात्र, वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या बाजूला अन्य झाडे ठेवणे अशुभ मानले जाते. त्यावर घरावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.
घरात तुळशीचे रोप असल्यास पॉझिटिव्हीटी राहते, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. मात्र, घरात तुळस ठेवताना काही नियमही पाळणे गरजेचे आहे.
वास्तुशास्त्रानुसार, तुळशीच्या रोपाजवळ वडाचे झाड ठेवू नये असं म्हणतात. ही दोन्ही झाडे जवळजवळ ठेवल्याने वाद निर्माण होऊ शकतात.
कडुलिंबाचे झाड तुळशीजवळ ठेवू नये. कारण त्यामु्ळं आरोग्यासंबधी समस्या उत्पन्न होऊ शकतात.
तुळशीजवळ इतर झाडे ठेवल्याने घरातील सुख-शांतीत बाधा येते. त्यामुळं तुळशीजवळ झाडं ठेवू नये. त्यामुळं घरात शांतत नांदते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)