तृतीयपंथींना समाजात अपमानित केलं जातं. पण देवाची त्यांच्यावर विशेष कृपा असते, असं म्हणतात. ज्याला तो आशीर्वाद देतो त्याचं नशीब रातोरात चमकतं.
लग्न, मुलं, सण इत्यादी प्रत्येक शुभ कार्यात ते येतात. चांगले आशीर्वाद देऊन जातात. तृतीयपंथींना काही गोष्टी दान केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते.
तसं तर तृतीयपंथी कधीही स्वत:जवळचे पैसे कोणाला देत नाही. पण जर तुमच्यावर प्रसन्न होऊन नाणे किंवा रुपया देतो तर ते खूप शुभ मानलं जातं.
यांच्याकडून मिळालेले पैसे तुम्ही तिजोरीत ठेवा, असं केल्याने लक्ष्मीचा तिथे वास राहतो. घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
आर्थिक स्थिती खराब असेल, पैसा घरात टिकत नाही. तेव्हा तृतीयपंथींनी दिलेले पैसे तुमचं नशीब सुधारेल.
त्यांनी दिलेले पैसे घरातील पवित्र ठिकाणी पूजा करुन ठेवा. त्यामुळे घरात समृद्ध नांदते.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तृतीयपंथींचा संबंध बुध ग्रहाशी जोडला जातो. म्हणूनच त्यांना विशेषतः बुधवारी नाणे मागितले पाहिजे. असे केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते. त्याच वेळी नशीब देखील चमकते. प्रत्येक रखडलेले काम पूर्ण होऊ लागते, एवढेच नाही तर आपत्तीही टळते.
तुम्हाला नाणे दिले तर तुम्ही ते हिरव्या कपड्यात गुंडाळून पर्समध्ये ठेवावे. असे केल्याने महालक्ष्मी आणि कुबेर देव यांच्या आशीर्वादांचा वर्षाव नेहमी होतो.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना वाईट नजर लागली असेल. तर तृतीयापंथीने दिलेल्या नाण्यामुळे वाईट नजर पासून तुमचं संरक्षण होतं.
घरात कोणी आजारी असेल तर तृतीयपंथीने दिलेले पैसे घरात ठेवा. यामुळे व्यक्ती निरोगी होण्यास मदत होते.
आर्थिक संकट दूर करण्यासाठी तृतीयपंथीला घरी बोलवा आणि त्यांना भेटवस्तू मागा. ती वस्तू तिजोरीत ठेवा.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)