धार्मिक शास्त्रानुसार दररोज तुळशीला जल अर्पण केल्याने देवी लक्ष्मी घरात कायम वास करते असे म्हटले जाते.
असे मानले जाते की, सकाळी आणि संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावल्याने धनसंपत्ती प्राप्त होते.
हिंदु धर्मात तुळशीला देवीचे स्थान दिले जाते. तुळशीची नियमित पुजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात.
ज्योतिष शास्त्रानुसार तुळशीला दर गुरुवारी दुधाचा अभिषेक केल्याने कुंडलीतील गुरुचा प्रभाव वाढतो.
भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहे, त्यामुळे नियमितपणे तुळशीला दुध अर्पण केल्याने घरातील वादविवाद दूर होतात.
वास्तुदोष दूर करण्याकरीता घराच्या वायव्य दिशेला तुळशीचे रोप लावण्याचा सल्ला दिला जातो.
पुर्वीच्या काळी महिलांना बाहेर पडण्याची मुभा नव्हती त्यामुळे त्या तुळशीला आपली मैत्रिण समजून मन मोकळं करत असे.